🌸
*एकदा देवळात भागवत कथा झाली. सांगता झाली , तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवरा-आवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली , "प्रसाद कधी भेटेल?"*
*सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढय़ात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली , "थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !"*
#deshmukhclassespusad
*वृद्धेला आनंद झाला.*
*बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली , "पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.... पोट भरण्यासाठी नाय् !"*
*मला तिचे पाय धरावे वाटले.*
*आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले. हव्यास आणि हट्ट सोडणे महत्त्वाचे*
*परमार्थ वेगळे काय शिकवतो ?*
🌸
देशमुख क्लासेस पुसद
आमची क्लासेस
इंग्रजी व्याकरण
मराठी व्याकरण
हिंदी व्याकरण
गणित
बुद्धिमत्ता चाचणी
जनरल नॉलेज
रेग्युलर क्लासेस
नर्सरी ते दहावी
इंग्रजी- सेमी इंग्रजी - मराठी
आजच संपर्क करा
9284735932
0 Comments