विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर द्वारा आयोजित उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरा करिता यवतमाळ जिल्ह्यातील 14 वर्षे आतील (01/09/2009 ते 31/08/2011 दरम्यान चा जन्म) मुलांची निवड चाचणी दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी व 19 वर्षे आतील (01/09/2004 ते 31/08/2007 दरम्यान चा जन्म) मुलांची निवड चाचणी दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी तालुका क्रीडा संकुल पांढरकवडा जि. यवतमाळ येथे सकाळी 08:30 वाजता होणार आहे. सदर निवड चाचणी निशुल्क असून, निवड चाचणी करिता विदर्भ क्रिकेट संघटनेचे निवड समिती सदस्य खेळाडूंची निवड करतील. सदर निवड चाचणी करिता येताना स्वतःचा जन्म तारखेचा दाखला आधार कार्ड व संपूर्ण किटसह जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित रहावे असे आवाहन विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा समिती अध्यक्ष शरद पाध्ये व यवतमाळ जिल्हा क्रिकेट समिती अध्यक्ष बाळू नवघरे यांनी केले आहे.
0 Comments