DESHMUKH CLASSES

DESHMUKH CLASSES

*NMMS परिक्षेत देशमुख क्लासेसच्या विद्यार्थ्यांची घवघवीत यशाची उत्कृष्ट कामगिरी*

🌟 *रेकॉर्ड ब्रेक यशाची अभिमानास्पद परंपरा!* 🌟
देशमुख क्लासेस पुसद च्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उल्लेखनीय आणि रेकॉर्ड ब्रेक यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या *National Means-cum-Merit Scholarship (NMMS) स्पर्धा परीक्षेमध्ये तब्बल ३० विद्यार्थी उत्तीर्ण करून एक नवा इतिहास घडविला आहे.* 
हे यश केवळ आकड्यांमध्ये मोजण्यासारखे नाही, तर हे क्लासेसच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेचे, नियोजनबद्ध मार्गदर्शनाचे आणि कठोर परिश्रमाचे ज्वलंत उदाहरण आहे.
या अभूतपूर्व यशामागे —
🔹 विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्य आणि प्रचंड मेहनत
🔹 पालकांचे सहकार्य व विश्वास

 *मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमतांची अचूक ओळख करून त्यांना योग्य दिशा दिली. नियमित सराव, परीक्षाभिमुख अध्यापन, वैयक्तिक लक्ष आणि सकारात्मक वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.* 
विद्यार्थ्यांनीही शिस्तबद्ध अभ्यास, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर हे यश मिळवले. पालकांनी दिलेला पाठिंबा आणि विश्वास हा त्यांच्या यशाचा मजबूत पाया ठरला.
हे यश केवळ क्लासेस पुरते मर्यादित नसून सर्व विद्यार्थी यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. योग्य दिशा, समर्पण आणि सामूहिक प्रयत्न यांच्या जोरावर पुसद भागातील मुले देखील राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी घेऊ शकतात, याचे हे दैदिप्यमान उदाहरण आहे.
👏 या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, व पालकांचे *मनःपूर्वक अभिनंदन!* 
💐 पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
अशीच यशाची परंपरा अखंडित सुरू राहो, हीच सदिच्छा! 💐🙏🙏✌️🎊📚🖊️🪷💐💐🏆🥇🏆🥇

Post a Comment

0 Comments