DESHMUKH CLASSES

DESHMUKH CLASSES

विभाज्यतेच्या कसोट्या

 गणित 

Math 

 विभाज्यतेच्या कसोट्या 

2 ची कसोटी :- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 हे अंक असतील त्या संख्येला 2 ने पुर्ण भाग जातो. 

उदा = 100,112,124,136,148,150


3 ची कसोटी :- ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला सुध्दा 3 ने पुर्ण भाग जातो. 

उदा :- 135=1+3+5=9


4 ची कसोटी :-

ज्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांना 4 ने भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शेवटी कमीत कमी 2 शून्य असतात त्या संख्येला 4 ने पुर्ण भाग जातो. 

19516 = शेवटचे दोन अंक 16 ला 4 ने पुर्ण भाग जातो म्हणून 19516 ला सुध्दा 4 ने पुर्ण भाग जातो. 

5000 या संख्येच्या शेवटी 00 आहेत त्यामुळे 5000 ला 4 ने पुर्ण भाग जातो. 


5 ची कसोटी :- ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 हे अंक असतील तर त्या संख्येला 5 ने पुर्ण भाग जातो. 

उदा :- 245, 100 


6 ची कसोटी :-  b संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पुर्ण भाग जातो. 

उदा :- 246 

246 च्या एकक स्थानी 6 अंक असल्यामुळे 246 ला 2 ने पुर्ण भाग जातो. 

2+4+6= 12 ला 3 ने पुर्ण भाग जातो म्हणून 246 ला 3 ने पुर्ण भाग जातो. 


7 ची कसोटी :संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणार्‍या संख्येतून डावीकडील उरलेल्या अंकांनी तयार झालेली संख्या वजा करून आलेल्या संख्येस 7 ने निःशेष भाग गेल्यास त्या संख्येला 7 ने निःशेष भाग जातो


8 ची कसोटी :- ज्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांना 8 ने भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शेवटी कमीत कमी 000 असतात त्या संख्येला 8 ने पुर्ण भाग जातो 

उदा :- 15112,  10000


9 ची कसोटी :- ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जातो त्या संख्येला 9 ने पुर्ण भाग जातो. 

उदा :- 8181 =8+1+8+1=18 या संख्येला 9 ने पुर्ण भाग जातो म्हणून 8181 या पूर्ण संख्येला 9 ने पुर्ण भाग जातो 


10 ची कसोटीr :- ज्या संख्येच्या शेवटी कमीत कमी 0 असते त्या संख्येला 10 भाग जातो. 

उदा :- 590


11 ची कसोटी : ज्या संख्येच्या विषम स्थानच्या वा समस्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक 0 अथवा 11 च्या पटीत असल्यास त्या संख्येला 11 नेy6 निःशेष भाग जातो


12 ची कसोटी : ज्या संख्येला 3 व 4 या अंकांनी भाग जातो त्या संख्येला 12 ने निःशेष भाग जातो


15 ची कसोटी : ज्या संख्येला 3 व 5 या अंकांनी भाग जात असेल तर त्या संख्येला 15 ने निःशेष भाग जातो


36 ची कसोटी : ज्या संख्येच्या अंकास 9 ने निःशेष भाग जातो आणि iज्या संख्येतील शेवटच्या अंकांना 4 ने भाग जातो त्या संख्येला 36 ने भाग जातो किंवा ज्या संख्येला 9 व 4 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला 36 ने भाग जातो


72 ची कसोटी : ज्या संख्येला 8 व 9 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला 72 ने

निःशेष भाग जातो


Post a Comment

0 Comments