DESHMUKH CLASSES

DESHMUKH CLASSES

NAVODAYA VIDYALAYA EXAM



JNVST 6th Admission 2025
*"जवाहर नवोदय विद्यालय" पूर्ण माहिती इ. 5 वी च्या मुलांना share करा.*

'जवाहर नवोदय विद्यालय’  ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना राजीव गांधी यांनी मांडली होती. ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो. येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते. या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी -प्रत्येक जिल्ह्यातून साधारणपणे 6000-7000 विद्यार्थी नवोदय ची परीक्षा देतात ज्या परीक्षेत top 80 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 6वी -12वी मोफत शिक्षण मिळते. ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी  देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात.

देशातील गुणवंत, गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यातच मोफत दर्जेदार शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जवाहर नवोदय विद्यालये सुरू केली आहेत. यानुसार भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आले आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वजिल्ह्यातच उच्च दर्जाच्या मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हा या जिल्ह्यानिहाय नवोदय विद्यालय सुरू करण्यामागचा केंद्र सरकारचा मुख्य हेतू आहे. केंद्र सरकारने १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नॅशनल एज्युकेशन पाॅलिसी) मंजूर केले आहे. या धोरणातील तरतुदीचाच एक भाग म्हणून भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय सुरू केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेली ही स्वायत्त संस्था आहे. येथील अभ्यासक्रम हा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) असतो.

या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता सहावीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. मात्र या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नि: शुल्क शिक्षण देण्यात येते. निवास व भोजनाची मोफत सोय केली जाते. याशिवाय गणवेश, पाठ्यपुस्तके, क्रीडा साहित्य, लेखन सामग्री, स्टेशनरी आदींचा सर्व खर्चही विद्यालयामार्फतच करण्यात येतो. या विद्यालयातील एकूण प्रवेशांपैकी ७५ टक्के जागा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रवेशासाठी दरवर्षी लेखी परीक्षा घेण्यात येते. या परिक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

भारत सरकारने सुरु केलेल्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये (JNVs) इयत्ता 6 वी साठी प्रवेश मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. हे विद्यालय विद्यार्थ्यांना मोफत आणि उत्तम शिक्षण देतात. तुम्ही तुमच्या पाल्याला चांगले शिक्षण देऊ इच्छित असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

📌 JNVST 6th Admission 2025 संपूर्ण माहिती
➤ काय आहे जवाहर नवोदय विद्यालय?
जवाहर नवोदय विद्यालय हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने चालवलेले निवासी विद्यालय आहेत. हे विद्यालय 27 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले आहेत. येथे मुलांना इयत्ता 8 वी पर्यंत मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून शिक्षण दिले जाते आणि त्यानंतर गणित व विज्ञानासाठी इंग्रजी आणि सामाजिक विज्ञानासाठी हिंदी माध्यमातून शिक्षण दिले जाते. येथे शिक्षण, राहणे, जेवण, गणवेश आणि पाठ्यपुस्तके पूर्णपणे मोफत आहेत.

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2025

➤ प्रवेश कसा मिळेल?
प्रवेश JNVST (Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test) च्या आधारे दिला जातो. ही परीक्षा इयत्ता 6 वी साठी घेतली जाते.

➤ पात्रता काय आहे?
विद्यार्थी ज्या जिल्ह्यात JNV आहे, त्याच जिल्ह्यातील रहिवासी असावा.
सद्य शैक्षणिक वर्षात (2025-26) इयत्ता 5 वी मध्ये शिकत असावा.
सरकारी/मान्यताप्राप्त शाळा किंवा NIOS मधून शिक्षण घेतलेला असावा.
विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2015 ते 30 एप्रिल 2017 दरम्यान झालेला असावा.
मागील वर्षी 5 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र नाहीत.
फक्त एकदाच अर्ज करता येतो.
●प्रवेशासाठी पात्रता निकष:
इच्छुक विद्यार्थी पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असावा
फक्त स्वत:च्या जिल्ह्यातच प्रवेश घेता येतो
संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही एका शाळेत प्रवेश असणे अनिवार्य
प्रवेशासाठी निश्र्चित केलेली वयाची अट पुर्ण करावी लागते
लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.
➤ आरक्षण धोरण:
75% जागा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राखीव.
SC, ST, OBC, दिव्यांग आणि मुलींसाठी आरक्षण.

➤ आवश्यक कागदपत्रे:
विहित नमुन्यातील अर्ज
पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याबाबतचा सक्षम पुरावा
आधारकार्ड (विद्यार्थी)
आधारकार्ड वडील
पासपोर्ट फोटो
जन्म प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
ग्रामीण प्रमाणपत्र (लागू असल्यास)
दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)


● नवोदय प्रवेश परीक्षा चाचणी स्वरूप व माहिती

1. चाचणीचे स्वरूप

·         एकच संयुक्त प्रश्नपत्रिका : 100 गुण

·         वेळ : 2 तास

·         मानसिक क्षमता चाचणी (40 प्रश्न: 50 गुण)

- विभाग एक

·         मानसिक क्षमता चाचणी (40 प्रश्न: 50 गुण)

नवोदय प्रवेशपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 'मानसिक क्षमता चाचणी' या विषयात एकूण दहा भाग असतात. दहा भागांत प्रत्येकी चार-चार प्रश्न असून एकूण 40 प्रश्न असतात. हे सर्व प्रश्न केवळ आकृत्यांचे असतात. प्रत्येक

भागाकरिता वेगवेगळ्या सूचना असतात. उमेदवारांच्या सुप्त क्षमतांचे मापन करणे हा या चाचणीचा उद्देश आहे.

-  विभाग दोन

·         अंकगणित : (20 प्रश्न 25 गुण)

या प्रश्नपत्रिकेतील अंकगणित या विषयावरील प्रश्नांचा उददेश उमेदवारांच्या अंकगणितातील मूलभूतक्षमता तपासणे हा आहे.

टीप : अंकगणित विषयाच्या चाचणीत मुख्यतः आकलन आणि उपयोजन यांच्या संबोधांवर आणि कौशल्यांवर भर देण्यात येतो.

-  विभाग तीन
·         भाषा : (20 प्रश्न 25 गुण)
यात 4 उतारे असतात.प्रत्येक उताऱ्यात 5 प्रश्न असतात.तुमचे भाषा विषयाचे ज्ञान यातून तपासले जाते.

जवाहर नवोदय विद्यालय ही केवळ एक शाळा नसून, ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना गुणवत्ता, संस्कार व नेतृत्वगुण विकसित करण्याची एक उत्तम प्रयोगशाळा आहे. येथील शिक्षकवर्ग अत्यंत तज्ञ आणि प्रेरणादायी आहे. नवोदय शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धा, कला, क्रीडा, संगणक शिक्षण, आणि राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी नवोदय विद्यालय एक मजबूत पाया पुरवते. येथे राहणीमान अत्यंत शिस्तबद्ध असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक समतेचे मूल्य व देशभक्तीचे बाळकडू दिले जाते. अनेक विद्यार्थी या शाळेतून शिकून डॉक्टर, इंजिनिअर, प्रशासन अधिकारी, संशोधक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तिमत्त्व बनले आहेत. त्यामुळे तुमच्या पाल्याच्या भविष्याची सुरक्षित आणि दर्जेदार वाटचाल याठिकाणी सुरू होऊ शकते.

✨ आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या संधीचा जरूर लाभ घ्या

*🗒️नवोदय परीक्षेची तुम्हांला परिपूर्ण तयारी करायची असेल तर आजच देशमुख क्लासेस पुसद येथे नोंदणी करा.
*🙏 देशमुख सर पुसद  🙏*
*📱संपर्क -9284735932*

Post a Comment

0 Comments