DESHMUKH CLASSES

DESHMUKH CLASSES

मराठी व्याकरण

मराठी
वर्णमाला
वर्णमाला
भारतात मातृभाषा 1652
22 भाषांचा घटनेमध्ये समावेश

आसामी बंगाली बोडो डोगरी गुजराती हिंदी कन्नड काश्मिरी कोकणी मैथिली मल्याळम मैतेई मराठी नेपाळी ओरिया पंजाबी संस्कृत सिंधी संथाळी तमिळ तेलगू उर्दू

सप्तशती दोन हजारवर्षांपूर्वीचा मराठीतील पहिला ग्रंथ आहे
मूळध्वनी - ध्वनीरुपे
12 स्वर, 34 व्यंजने, 2 स्वरादी
एकूण 48 वर्ण

संयुक्त व्यंजने- क्ष=क्+ष्
ज्ञ=द्+न्+य्

र्‍हस्व स्वर=अ,इ,उ,ऋ,लृ
दीर्घ स्वर = आ,ई,ऊ
संयुक्त स्वर =ए=अ+इ/ई,
ऐ=आ+इ/ई
ओ=अ+उ/ऊ
औ=आ+उ/ऊ
स्वरादी =अं,अः
व्यंजने/स्वरांत/परवर्ण=
स्पर्श व्यंजने (२५)=

अर्धस्वर(अंतस्थ) (४)=य,र,ल,व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ ऋ लृ उ योग्य क्रम य व र ल

उष्मे(घर्षक)=श,ष,स
महाप्राण(१४)=ख घ छ झ ठ ढ थ ध फ भ श ष स ह
अल्पप्राण= क ग ङ च ज ञ ट ड ण त द न प ब म य र ल व ळ
स्वतंत्र=ळ

आखूड /तोकड्या उच्चाराला निभृत उच्चार म्हणतात

कठोर व्यंजने(श्वास,अघोष)(१३)= क,ख च,छ,ट,ठ,त,थ,प,फ,श ष स

मृदू व्यंजने(नाद/घोषवर्ण)(३५) =अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए ऐ ओ औ अं अः ग घ ज झ ड ढ द ध ब भ य र ल व ह ळ ङ त्र ण न म

अ आ ओ औ अं अः ख ग घ च ज झ ञ ण त थ ध न प ब भ म य ल व श ष स    या वर्णाना शेवटी स्वतंत्र उभा दंड आहे

ऋ क फ या वर्णामध्ये उभा दंड असतो

इ  ई उ ऊ  ट ठ ड ढ द ह ळ यामध्ये अर्धा दंड असतो

अनुनासिक(परसवर्ण) = ङ ञ ण न म
ज्या अनुस्वाराबद्दल अनुनासिक वापरता येते त्याला स्पष्टोचारित अनुनासिक म्हणतात

य र ल व श ष स ह ळ यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल अनुनासिक न घेता केवळ शीर्षबिंदू द्यावा

र या वर्णाचा उच्चार करताना कंपन होते म्हणून त्याला कंपितवर्ण म्हणतात

कंठ्य वर्ण= अ आ क ख ग घ ङ ह
तालव्य = इ ई च छ ज झ ञ य श
मूर्धन्य= ऋ ट ठ ड ढ ण र ष ळ
दंत्य= लृ त थ द ध न ल स
ओष्ठ्य= उ ऊ प फ ब भ म
कंठतालव्य =ए ऐ
कंठोष्ठ्य=ओ औ
दंतौष्ठ्य=व
दंततालव्य=च छ ज झ

व्यंजन+स्वर=अक्षर
स्वर+स्वर=संयुक्त स्वर
व्यंजन +व्यंजन=संयुक्त व्यंजन
व्यंजन+तेच व्यंजन =व्दित
व्यंजन+व्यंजन +स्वर=जोडाक्षर

पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन म्हटले आहे

वर्णमाला
मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक हे इंग्रजी भाषेत होते. आणि तो लिहिणारा इंग्रजी अभ्यासक होता. विल्यम कँरी. विल्यम कँरी यांनी इ.स 1805 मध्ये द ग्रामर आँफ मराठी लँग्वेज या नावाने पुस्तक लिहिले.
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी इ.स 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण या नावाने पुस्तक लिहिले. शुध्द कसे बोलावे व शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते. असे उद्गार आद्य मराठी व्याकरणकार दादोबांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र भाषेचे व्याकरण या पुस्तकाला मराठी व्याकरणाची गंगोत्री संबोधल्या जाते.
व्याकरण = वि+आ+कृ=स्पष्टीकरण करणे
भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरविले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय.
भाषा ='भाष' या संस्कृत धातूवरुण भाषा हा शब्द तयार झालेला आहे.
विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय.
भाषेचे प्रमुख दोन प्रकार
नैसर्गिक भाषा =हावभावांची भाषा
कृञिम भाषा =विशिष्ट संकेत ठरवून मनातील भाव व्यक्त करणारी भाषा
महाराष्ट्रातील लिपीला देवनागरी लिपी किंवा बाळबोध लिपी असेही म्हणतात.
देवनागरी लिपी- मराठी, संस्कृत,हिंदी, गुजराती, पाली.
लिप- लिपी (सारवलेले /माखलेले )
लिख- लेखन (लिहिलेले /कोरलेले)
मराठी भाषेचा उगम "संस्कृत - प्राकृत" या भाषेपासून झाला. 
मराठी
मराठी व्याकरण
मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक 1805 साली विल्यम कँरी यांनी द ग्रामर आँफ मराठी लँग्वेज या नावाने लिहिले.

मराठी व्याकरणाचे मराठीतील पहिले पुस्तक 1836 साली दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिले त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात.

मोरो केशव दामले यांनी मराठी व्याकरणाचा चिकित्सक व तर्कशुद्ध अभ्यास केला.

1960 साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाची स्थापना केली.

शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखक मोरो केशव दामले

मराठी भाषा इंडो युरोपियन कुळातील आहे.

मराठीतील पहिला शिलालेख श्रावणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो.

महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती बादामी यांच्या शिलालेखात सापडते.

1883 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी वाक्यमीमांसा हे पुस्तक लिहिले.
मराठीतील पहिला पोवाडा आगिनदास (अफजल खानाचा वध) महात्मा फुले

मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन (बाबा पद्मजी)

मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी मोचनगढ

आधुनिक मराठी नाट्यसृष्टीचे जनक विष्णुदास भावे

आधुनिक मराठी कादंबरी व नाट्यसृष्टीचे जनक ह.ना.आपटे

आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)

मराठी नवकाव्याचे जनक बा. सी. मर्ढेकर
मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832

मराठी भाषेचे शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकर

मराठीतील पहिले सामाजिक नाटक तृतीयरत्न

Post a Comment

0 Comments