DESHMUKH CLASSES

DESHMUKH CLASSES

गणित कालमापन

 गणित 

Math 

कालमापन 

सामान्य वर्ष 

एकूण दिवस 365

एकूण आठवडे 52+1 जादा

सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार 53 वेळा येतो बाकीचे वार प्रत्येकी 52 वेळा येतात

1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला येतो

सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस येतात. सामान्य वर्षात फेब्रुवारीच्या तारखेस येणारा वारच पुढील महिन्यातील त्याच तारखेस येतो

उदा-3 फेब्रुवारी 2007 ला शनिवार असल्यास 3 मार्च 2007 रोजी शनिवारच येईल 


सामान्य वर्षात 1 दिवस जादा असल्याने पुढील वर्षातील त्याच तारखेचा वार एक दिवसाने पुढे जातो. 

उदा- 1 जानेवारी 1997 ला बुधवार असेल तर 1 जाने 1998 ला गुरुवार असेलक 


तीस दिवसाच्या महिन्यानंतर पुढील महिन्यात त्याच तारखेला येणारा वार दोन दिवसांनी तर 31 दिवसाच्या महिन्यानंतर पुढील महिन्यात त्याच तारखेचा वार तीन दिवसांनी पुढे सरकतो. 


लीप वर्षे 

ज्या वर्षाला 4 ने नि:शेष भाग जातो व ज्या सनाच्या शेवटी दोन शुन्य असल्यास 400 ने निःशेष भाग जातो ते लीप वर्षे होय. 


लीपवर्षात एकूण दिवस 366 दिवस असतात

एकूण आठवडे 52+2 दिवस जादा 

फेब्रुवारी 29 दिवस 


फेब्रुवारीच्या कोणत्याही तारखेचा वार हा पुढील महिन्यात एक दिवसाने पुढे सरकतो

1 फेब्रुवारी 2008 ला शुक्रवार असल्यास 1 मार्च 2008 ला शनिवार येईल. 


1 व 2 जाने ला असणारे वार 53 वेळा व बाकीचे वार 52 वेळा येतात. 


लीप वर्षात 2 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. 


लीप वर्षात दोन दिवस जादा असल्याने त्याच तारखेचा वार पुढील दोन दिवसांनी पुढे जातो. 

उदा - 1 जाने 1996 ला सोमवार होता तर 1 जाने 1997 ला बुधवार होता. 


दिनांक व वार समान असलेले महिने

सामान्य वर्ष

जाने - आक्टो

फेब्रु- मार्च - नोव्हें

एप्रिल- जुलै

सप्टेंबर - डिसेंबर 


लीप वर्षे 

जाने- एप्रिल - जुलै 

फेब्रुवारी - आँगस्ट 

मार्च - नोव्हें

सप्टेंबर - डिसेंबर


दिनदर्शिका - एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस

महाराष्ट्र दिन गांधी जयंती नाताळ एकाच वारी येतात


टिळक पुण्यतिथी स्वातंत्र्य दिन शिक्षक दिन एकाच वारी येतात 

Post a Comment

0 Comments