🎯 *शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाताना या गोष्टी लक्षात असू द्या.*
शिष्यवृत्ती परीक्षा 2023-24
परीक्षा दिनांक - 18 फेब्रुवारी 2024
वार - रविवार
वेळ –
पेपर 1 - सकाळी 11:00 ते 12:30
पेपर 2 - 02:00 ते 3:30
विद्यार्थी मित्रांनो,
देशमुख क्लासेस शिष्यवृत्ती उपक्रम मोफत मार्गदर्शन मध्ये आपले स्वागत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली जाते. या परीक्षेला UPSC परीक्षेचे पहिली पायरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ही परीक्षा संयमाची आहे. शांत डोके ठेवून पेपर सोडवणे महत्त्वाचे असते. प्रत्येक विद्यार्थ्यांची एक महत्त्वाकांक्षा असते की आपली निवड शिष्यवृत्ती परिक्षेकरिता व्हावी.
परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडे Admit Card (Hall ticket) असणे आवश्यक असते.
परीक्षेला जाण्यापूर्वी कोणती तयारी करावी ? सोबत काय काय घ्यावे ?
*📌Admit card (हॉल टिकीट)*
*📌Black / Blue ball pen. (दोन पेन असाव्यात. घरीच एकदा चालवून पहाव्यात)*
📌 *प्रत्येक प्रश्न प्रश्नचिन्हापर्यंत व्यवस्थित वाचा.*
📌 *गणित कितीही सोपे वाटत असले तरी ते तोंडी न करता लिहूनच सोडवा.*
📌 एखादा प्रश्नांचे उत्तर मिळत नसल्यास तेथेच थांबू नका, पुढील प्रश्न सोडवा.
📌 *प्रश्न व उत्तरपत्रिकेतील गोल करावयाचा क्रमांक योग्य असल्याची खात्री करुनच पर्यायाला गोल करा.*
📌 कोणतेही दडपण, भिती मनात न बाळगता पेपर सोडवा.
📌 *पहिला पेपर झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नांबाबत चर्चा करु नका.*
📌 घामामुळे उत्तरपत्रिका खराब होऊ नये म्हणून घाम आल्यानंतर तळहात आठवणीने पुसा.
📌 *पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचा.* त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा.
📌 इ. 8वी साठी काही प्रश्नांच्या उत्तरात दोन पर्याय राहू शकतात. जिथे दोन पर्याय असतील तिथे दोन गोल रंगवा.
📌 Pad
📌 साधी घड्याळ (digital नसावी)
📌 पेन्सिल
📌 खोडरबर
📌 sharpner
📌 चष्मा लागलेला असेल तर तो सोबत घ्यावा.
📌 पाणी बॉटल. (टेबलवर ठेवू नये, झाकण घट्ट लावावे जेणेकरून पेपरवर पाणी सांडणार नाही.)
📌 हातरुमाल (Handkarchief)
परीक्षा हॉलमध्ये किती वाजता पोहोचावे ?
विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची वेळ 11:00 ते 12:30 आहे. परंतु आपणास एक तास अगोदर म्हणजेच 10:00 वाजता परीक्षा हॉलमध्ये पोहोचायचे आहे.
परीक्षा हॉलमध्ये पोहोचल्यानंतर आपण आपल्या सीट नंबर प्रमाणे बसून घ्यावे.
प्रत्येक प्रश्नामागे A, B, C आणि D चिन्हांकित चार पर्यायी उत्तरे असतात. उमेदवाराने योग्य उत्तर निवडणे आणि OMR उत्तरपत्रिकेवर निवडलेल्या उत्तराचे संबंधित वर्तुळ गडद करणे आवश्यक आहे. निगेटिव्ह मार्किंग केले जाणार नाही.
वरील सर्व माहिती माझ्या स्वतःच्या अनुभवातून लिहिलेली आहे. हे माझे स्वतःचे मत आहे. तुम्ही माझ्या मताशी 100% सहमत असालच असे नाही.
💐 *शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!*
*All The Best Wishes*
💐💐💐💐💐💐💐
*रुपेश देशमुख*
*देशमुख क्लासेस*
*पुसद*
*9284735932*
0 Comments